डोंबिवलीकर तरुणीने बनविले स्मृतिभ्रंश दूर करणारे औषध!

modak
डोंबिवली : एका डोंबिवलीकर तरुणीने स्मृतिभ्रंश किंवा अल्झायमर्स हा आजार हद्दपार करणारे औषध शोधून काढले आहे. बेन्झोपायरॉल्ड हे रसायन ब्रिटनमध्ये मँचेस्टर विद्यापीठात संशोधन करून स्वानंदा मोडक यांनी विकसित केले आहे. त्याचे पेटंटही अमेरिका आणि युरोपमध्ये त्यांनी मिळवले आहे, तर जपानकडे पेटंटसाठी अर्ज केला आहे.

उंदरांवरचे या औषधाचे प्रयोग यशस्वी झाले आहेत. आगामी काळात त्याच्या क्लिनिकल टेस्ट घेण्यात येतील. साधारण ४ ते ५ वर्षांत हे औषध उपचारासाठी उपलब्ध होऊ शकेल.

डोंबिवलीच्या मॉडेल हायस्कूल आणि पेंढारकर कॉलेजच्या स्वानंदा या विद्यार्थिनी आहेत. त्यांनी मँचेस्टर विद्यापीठात मेडिकल जेनेटिक्समध्ये मास्टर्स मिळवली आहे. त्यांच्या आजोबांना स्मृतिभ्रंश होता. अल्झायमर्स झालेल्या रुग्णाचा किती सांभाळ करावा लागतो, हे त्यांनी जवळून बघितल्यामुळे या आजारावर कायमस्वरुपी उपाय शोधून काढण्याच्या ध्यासातून स्वानंदा यांनी हे संशोधन केले.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

1 thought on “डोंबिवलीकर तरुणीने बनविले स्मृतिभ्रंश दूर करणारे औषध!”

  1. चंद्रकांत निळोबा कदम

    स्वानंदाजी सादर प्रणाम
    स्मृतीभृंश ‘ आजाराबद्द्ल आपणांस काही उपाय योजना सांगता येईल काय ?

Leave a Comment