मेक्सिकोतील चुंबन गल्ली

kiss
मेक्सिकोत एक विशेष स्थळ आहे व त्या जागेचे नांव आहे चुंबन किंवा किस लेन. खोटे वाटेल पण अतिशय निमुळत्या या गल्लीत चुंबन घेण्यासाठी जोडपी अक्षरशः लाईनीत उभी असतात आणि आपला नंबर येण्याची प्रतीक्षा मोठ्या आतुरतेने करतात. कारण यामागे असा समज आहे की या गल्लीत चुंबन घेतले तर जोडप्यांची किमान १५ वर्षे सुखसमाधानात व्यतीत होतात. फेब्रुवारी महिन्यात येथे प्रेमी युगलाची मोठी गर्दी असते असेही सांगितले जाते.

या गल्लीचे नावच मुळी अल कॅलेजन डेल बेसो म्हणजे चुंबन गल्ली असेच आहे. सेंट्रल मेक्सिकोतील हे ठिकाण म्हणजे अतिशय अरूंद अशी गल्ली आहे व येथे घरेही इतकी लागून आहेत की या घरातून समोरच्या घरातल्या व्यक्तीला सहज चुंबन देता येते. अशी हकीकत सांगतात की डोना कार्मेन व लुईस यांची ही प्रेमकहाणी आहे. डोना श्रीमंत घरातली तर लुइॅस गरीब घरातला. अर्थातच त्यांच्या प्रेमाला डोनाच्या वडीलांचा विरोध होता. मग लुईनने डोनाच्या घराच्या बाल्कनीसमोरील घरात खोली भाड्याने घेतली. रात्री निजानीज झाली ही हे प्रेमी आपापल्या घरातूनच एकमेकांवर चुंबनांचा वर्षाव करत असत. डोनाच्या वडीलांने हे समजल्यावर त्यांनी डोनाला ठार केले. लुईसने तिला वाचविण्यासाठी बाल्कनीतून उडी घेतली पण तो खाली पडला व त्याची मान मोडली. तेव्हापासून ही गल्ली चुंबन गल्ली म्हणून प्रसिद्धीस आली.

या गल्लीत डोना ज्या खोलीत रहात असे तेथे सध्या भेटवस्तूंचे दुकान आहे. मात्र आजही प्रेमी युगले येथे येऊन चुंबन घेतात, भिंतीवर संदेश लिहितात व त्या खिडकीवर कुलपेही अडकवितात.

Leave a Comment