चक्क शेणावर चालते ही कार

toyata
नवी दिल्ली : शेणाचा वापर भारतात केवळ गोवऱ्या आणि गोबर गॅससाठी केला जातो. पण एका कार कंपनीने चक्क कार चालवण्यासाठीच शेणाचा वापर केला आहे.

ही कार २० वर्षाचे संशोधन आणि लाखो डॉलरच्या खर्चानंतर ही कार टोयाटाने बनवली आहे. कारमध्ये हायड्रोजन फ्यूअल स्टीकच्या मदतीने गॅस जातो आणि हायड्रोजनसोबत ऑक्सिजन गॅसचे मिश्रण होते. या संपूर्ण प्रोसेसमुळे ऑन बोर्ड बॅटरी चार्ज करण्यासाठी आवश्यक वीज निर्माण होते. यात ११४ किलोवॅटचे फ्युअल स्टिक आणि ११३ किलोवॅटची इलेक्ट्रिक मोटार बसवण्यात आली आहे. जपानमध्ये या कारची किंमत साधारण ३५ लाख रुपयांपर्यंत आहे.