उबेर टॅक्सी महाराष्ट्रात देणार ७५ हजार रोजगार

uber
मुंबई – अॅप टॅकसी बुकींग सेवा देणारी उबेर कंपनी महाराष्ट्रात येत्या पाच वर्षात ७५ हजार नव्या नोकर्‍या देणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. या संदर्भातला सहमती करार महाराष्ट्र सरकार आणि उबेर कंपनी यांच्यात नुकताच केला गेला आहे.

उबेरमधील वरीष्ठांनी दिलेल्या माहितीनुसार या रोजगारात कंपनी प्रामुख्याने वंचित समाज व महिलांना भरती करण्यावर भर देणार आहे. येत्या पाच वर्षात या पातळीवरील लोकांना प्रशिक्षण देऊन नोकरीत समाविष्ट केले जाणार आहे. मेक इन इंडिया इनिशिएटिव्हचाच हा एक भाग असून ही संधी मिळाल्याबद्दल कंपनीने आनंद व्यक्त केला आहे.

Leave a Comment