अंगोलाच्या खाणीत सापडला ४०४ कॅरटचा हिरा

diamond
दक्षिण आफ्रिकेतील अंगोलाच्या हिरे खाणीतील लुलो भागात तब्बल ४०४ कॅरटचा हिरा मिळाला असून त्याची किंमत १.४३ कोटी डॉलर्स म्हणजे ९७ कोटी रूपये आहे. ऑस्ट्रेलियातील लुकापा हिरे कंपनीला हा सर्वात मोठा हिरा गवसला असून तो जगातील २७ वा मोठा हिरा आहे. त्याची लांबी आहे ७ सेंमी.

या खाणीत २०१५ पासून खोदाई सुरू झाली आहे. तेव्हापासून आत्तापर्यंत या खाणीतून ६० हून अधिक मोठ्या आकाराचे हिरे मिळाले आहेंत. त्यात नुकताच सापडलेला हिरा हा सर्वात मोठा हिरा ठरला आहे. पांढर्‍या रंगाचा हा हिरा फ्लॉलेस असल्याने त्याची किंमत अधिक आहे.