मायक्रोसॉफ्टचा नवा लुमिया ६५० स्मार्टफोन लाँच

microsoft
मुंबई: आपल्या लुमिया सीरीजमधील नवा स्मार्टफोन लुमिया ६५० मायक्रोसॉफ्टने लाँच केला आहे. याची किंमत जवळजवळ १९९ डॉलर (जवळजवळ १३,५०० रु.) आहे. भारतीय वेबसाइटवरही मायक्रोसॉफ्ट लुमिया ६५० लिस्ट करण्यात आला आहे. त्यामुळे भारतातही हा स्मार्टफोन लाँच करण्यात येईल अशी आशा आहे. वेबसाइट लिस्टिंगमध्ये या स्मार्टफोनची किंमत देण्यात आलेली नाही.

मायक्रोसॉफ्ट लुमिया ६५०चे फीचर: > ड्यूल सिम सपोर्ट > ५ इंच एचडी डिस्प्ले, रिझ्युलेशन ७२०×१२८० पिक्सल > विंडोज १० ऑपरेटिंग सिस्टम > १.३Ghz क्वॉड-कोअर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन २१२ > १ जीबी रॅम, १६ जीबी इंटरनल मेमरी, २०० जीबीपर्यंत मेमरी वाढविता येऊ शकते. > ८ मेगापिक्सल रिअर ऑटोफोकस कॅमेरा, ५ मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा > २००० mAh बॅटरी क्षमता. सध्या या स्मार्टफोनची विक्री युरोपातील काही देशांमध्येच होणार आहे.

Leave a Comment