आयटी क्षेत्रात मिळत आहे सर्वाधिक वेतन

it
नवी दिल्ली – सध्या भारतातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रामधील (आयटी) कर्मचा-यांना सर्वाधिक वेतन मिळत असून या क्षेत्रामध्ये प्रत्येक तासाला सरासरी पगार ३४६.४२ रुपये मिळत आहे. तर याच्या उलट स्थिती उत्पादन क्षेत्राची असून, येथील कर्मचा-यांना सर्वात कमी वेतन मिळते. या क्षेत्रामध्ये प्रत्येक तासाला सरासरी वेतन २५४.०४ रुपये आहे.

मान्स्टर सॅलरी निर्देशांक एमएसआयनुसार, भारतामध्ये सर्वाधिक वेतन देणारे आयटी क्षेत्र आहे. मात्र केवळ ५७.४ टक्के कर्मचारी आपल्या या मिळणा-या वेतनावर समाधानी आहेत. आणखी वेतनवाढ हवी, अशी त्यांची मागणी आहे. तसेच बँक, वित्त आणि विमा क्षेत्र (बीएफएसआय) दुस-या क्रमाकांवर येते. येथे प्रत्येक तासाला सरासरी ३००.२३ रुपये वेतन मिळते.

आयटी आणि बीएफएसआय भारतामध्ये सर्वात अधिक वेतन देणारे क्षेत्र आहेत. मात्र आश्चर्याची बाब म्हणजे या दोन्ही क्षेत्रातील जवळपास ५० टक्क्यांपेक्षा जास्त कर्मचारी आपल्या मिळणा-या भरमसाठ वेतनावर नाराज आहेत.

Leave a Comment