तोतरेपणा मेंदूसाठीही घातक

problem
काही लोकांच्या बोलण्यात दोष असतो आणि त्यांना योग्य ते शब्द आठवण्यात अडचणी येतात. त्यामुळे त्यांच्या बोलण्यातच दोष आहे असे मानले जाते. परंतु अमेरिकेतील मिनेसोटाच्या मेयो क्लिनिक या संस्थेतील तज्ञांनी असे निरीक्षण केले आहे की बोलण्यातला हा दोष परिणामी मेंदूसाठीसुध्दा घातक असतो. एवढेच नव्हे तर सार्‍या शरीरातच या दोषाचे परिणाम दिसू शकतात. तोतरेपणा किंवा बोलण्यातील दोष असणार्‍या व्यक्तीमध्ये पुढे पुढे काही वेगळे दोष दिसायला लागतात. बोलण्याचा वेग कमी होणे किंवा बोलताना शब्द तोंडाबाहेर न पडता त्यास अनुकूल अशी केवळ ओठांची हालचाल होणे असे परिणाम जाणवायला लागतात.

हे परिणाम जाणवण्याचे मुख्य कारण म्हणजे बोलण्यातला तोतरेपणा मेंदूत पसरत जाणे हे असते. कोणताही माणूस बोलतो तेव्हा त्याच्या तोंडातून शब्द बाहेर पडतात म्हणजेच विशिष्ट प्रकारे हवा बाहेर पडते. एकूण बोलणे ही क्रिया फुफ्फुसाची संबंधित असते. एखादा माणूस बोलतो तेव्हा आधी त्याच्या फुफ्फुसातील स्नायू हलतात आणि नंतर ओठातले स्नायू हलतात. फुफ्फुस ते ओठ या दरम्यानचे १०० स्नायू एका सेकंदाला हलतात आणि त्या सेकंदाला १४ निरनिराळे आवाज निर्माण होतात.

एखादा माणूस तोतरा बोलतो याचा अर्थ त्याच्या या स्नायूंवर परिणाम झालेला असतो आणि या स्नायूंच्या हालचाली मेंदूवर अवलंबून असल्याने त्याचा हा दोष म्हणजे मेंदूचा दोष ठरतो. म्हणूनच सुरूवातीला जी व्यक्ती तोतरी असते तिच्या तोतरेपणावर लवकर इलाज न झाल्यास पुढे पुढे तिच्या मेंदूवरही परिणाम होतो.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment