राणकपूर- सुंदर मंदिराचे मनोहर पर्यटनस्थळ

ranakpur
राजस्थानच्या पाली जिल्ह्यातील राणकपूर हा सुंदर मंदिरांची गर्दी असलेला भाग लोकप्रिय पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. येथे असलेले १५ व्या शतकातले जैन मंदिर विशेष प्रसिद्ध असून अंतहीन वाळवंटाच्या पार्श्वभूमीवरील हा मंदिर समूह म्हणजे डोळ्यांना मिळणारी अवीट मेजवानी आहे असे म्हटले तरी गैर होणार नाही. कदाचित या वाळवंटामुळेच या मंदिरांचे सौंदर्य अधिक खुलत असावे.

राणकपूरपासून जवळच ५-६ किमी अंतरावर असलेले सूर्य मंदिर आवर्जून पाहावे असे. खगोलिय आकृत्या, ग्रह, तारे,घोडे, योद्धे यांच्या सुंदर आकृत्या येथे दगडातून जिवंत केल्या गेल्या आहेत. हे मंदिर सूर्याला समर्पित आहे व येथे सूर्य रथावर स्वार झालेली सूर्य मूर्ती आहे. तसेच कुंभलगड अभयारण्याजवळ असलेल्या घनेराव येथील ११ जैन मंदिरातील महादेव मंदिरही फार प्रसिद्ध आहे. हे जैन मंदिर भगवान शिवाला समर्पित असून येथे मिशा असलेली शंकरमूर्ती आहे. अशा प्रकारचे हे बहुदा एकमेव शिवमंदिर आहे. तसेच येथील गजानन्द मंदिरही अत्यंत लोकप्रिय स्थळ आहे.

येथून ६ किमी असलेल्या नरलाई गावातही अनेक हिंदू आणि जैन मंदिरे आहेत व तेथील वास्तुकला व भित्तीचित्रे नजरेचे पारणे फेडतात.

Leave a Comment