चीनमध्ये सुरू सर्वात मोठ्या दुर्बिणीची उभारणी

Fast
बीजिंग: चीनमध्ये गुझोऊ प्रांतात जगातील सर्वात मोठ्या दुर्बिणीची उभारणी केली जात आहे. या शक्तिशाली दुर्बिणीमुळे अनेक नव्या आकाशगंगा मानवी दृष्टीच्या कक्षेत येण्याची शक्यता असून अंतराळात ‘एलियन्स’ अस्तित्वात असतील तर त्याचाही शोध लागू शकेल; असेही सांगण्यात येत आहे.

अंतराळ संशोधनाबाबत सन २०२० पर्यंत मोठी आघाडी घेण्याचा चीनचा निर्धार आहे. त्यानुसार ५०० मीटर अपार्चर स्फेरीकल रेडीओ टेलिस्कोप अर्थात ‘फास्ट’ हा प्रकल्प चीनने हाती घेतला आहे. सध्या अस्तित्वात असलेली सर्वात मोठी दुर्बीण पार्टो रिको येथील अर्सिबो वेधशाळेत असून तिची क्षमता ३०० मीटर अपार्चरची आहे.

‘फास्ट’च्या कक्षेत अंतराळाचा अधिकाधिक भाग घेता यावा आणि त्याची दिशाही अपेक्षित ठिकाणी वळविता यावी यासाठी या दुर्बिणीची डीश अतिविशाल मोटर्सवर बसविण्यात आली आहे. ही दुर्बीण अत्यंत संवेदनशील असून या दुर्बिणीद्वारे अर्सिबोमधील दुर्बिणीच्या तिप्पट पुढच्या अंतराळाचा वेध घेता येणार आहे. या दुर्बिणीमुळे हजारो नव्या आकाशगंगांचे निरीक्षण करता येणार असून तब्बल ७०० कोटी प्रकाशवर्ष अंतरावरील अंतराळाचा वेधही ही दुर्बीण घेऊ शकणार आहे.

Leave a Comment