एलजीचे एक्स कॅम व एक्स स्क्रीन स्मार्टफोन येणार

xcam
बार्सिलोना येथे होत असलेल्या वर्ल्ड मोबाईल काँग्रेसपूर्वीच एलजीने त्यांच्या एक्स सिरीजमधील दोन नव्या स्मार्टफोनची घोषणा केली आहे. त्यानुसार कंपनी एक्स कॅम व एक्स स्क्रीन असे दोन स्मार्टफोन लाँच करणार आहे.

नावाप्रमाणेच एक्स कॅमसाठी उत्तम कॅमेरा ही खासियत आहे. शिवाय अॅडव्हान्स डिस्प्लेही दिला गेला आहे. ५.२ इंचाचा फुल एचडी स्क्रीन, मार्शमेलो ६.० ओएस, २ जीबी रॅम, १६ जीबी इंटरनल मेमरी अशी अन्य फिचर्स आहेत. पोनसाठी १३ एमपी व ५एमपीचे दोन रियर कॅमेरे व ८ एमपीचा फ्रंट कॅमेरा दिला गेला असून थ्रीडी बेडींग ग्लासही दिली गेली आहे. हा फोन एलटीईला सपोर्ट करतो.

एलजी एक्स स्क्रीनसाठी नेहमी ऑन राहणारा सेकंड स्क्रीन दिला गेला आहे. ४.९३ इंची डिस्प्ले व त्यावर १.७६ इंचाचा सेकंड स्क्रीन अशी याची रचना असून तो मल्टीटास्कींगसाठी अत्यंत उपयुक्त आहे. त्यामुळे मेन अॅक्टीव्हीटी बंद न करताही कॉल रिसीव्ह करणे, म्युझिक कंट्रोल करणे युजरला शक्य होणार आहे. फोनला ३ जीबी रॅम, अँड्राईड मार्शमेलो ६.० ओएस, १३ एमपीचा रियर व ८ एमपीचा फ्रंट कॅमेरा,१६ जीबीची इंटरनल मेमरी दिली गेली आहे. हा फोनही एलटीईला सपोर्ट करतो. हे दोन्ही फोन पुढच्या महिन्यात लाँच होणार आहेत.

Leave a Comment