भारतीय कंपनीचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन बाजारात

freedom
स्थानिक मोबाईल हँडसेट कंपनी रिंगिंग बेल येत्या १७ फेब्रुवारीला देशातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन लाँच करत आहे. फ्रिडम २५१ असे नामकरण केलेल्या या फोनची किंमत ५०० रूपयांपेक्षाही कमी असून संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या हस्ते हा फोन लाँच होत आहे. देशात सध्या सर्वाधिक कमी किंमतीचा स्मार्टफोन १५०० रूपयांत येतो. या नव्या फोनच्या लॉचिंगमुळे स्मार्टफोन क्षेत्रात नवीन स्पर्धेची सुरवात होईल असे भाकित वर्तविले जात आहे.

रिंगिग बेलचे अधिकारी या संदर्भात माहिती देताना म्हणाले, पंतप्रधान मोदींच्या प्रत्येक व्यक्तीला अधिकार व प्रत्येकाचा विकास या व्हिजनशी साजेसा असा हा फोन आहे. गतवर्षीच कंपनीने फेस वन हँडसेंटचे असेंब्लींग सुरू केले होते. नवा फोन स्वदेशी आहेच शिवाय त्याला अनेक फिचर्सही दिली गेली आहेत. या कंपनीने यापूर्वी २९९९ रूपयात फोरजी स्मार्टफोनही लाँच केला आहे तसेच त्यांचे अन्य दोन फिचर्स फोनही बाजारात आहेत.

Leave a Comment