चमत्कारिक दगडाजवळ आग लावली की मिळतो ‘वायफाय’ सिग्नल

stone
भारतात फार पुर्वीपासून दगडात देव माणण्याची रीत रूढ आहे. विज्ञानाने एवढी प्रगती केली तरीही सुद्धा ती प्रथा अद्याप कमी होताना दिसत नाही. पण याच दगडाने जर्मनीत आपली जादू दाखवली आहे. ज्यामुळे सर्वसामान्यच काय पण संशोधकही हैराण झाले आहेत. एक अशा प्रकारचा दगड जर्मनीत आढळून आला आहे की, ज्याच्याजवळ आग लावली की, वायफाय सिग्नल मिळतो.

अशा प्रकाराचा दगड जर्मनीतील न्यएनकिर्चेन येथील एका म्यूजियममध्ये मिळाला असून ज्याच्याजवळ आग लावली की, वायफाय सिग्नल मिळतो. हे एक आउटडोअर स्कल्पचर्सचे म्युजियम आहे. येथे एका दगडाजवळ वायफाय राऊटर लावण्यात आले आहे. यात विशेष गोष्ट अशी की, जेव्हा या दगडाजवळ आग लावली जाते तेव्हाच या राऊटरमधून वायफाय कनेक्शनचा सिग्नल मिळतो.

एक थर्मोइलेक्ट्रिक जनरेटर दगडाभोवती लावण्यात आले आहे. ज्यात उष्णतेला विद्यूत प्रवाहात परावर्तीत करण्याची क्षमता आहे. याच कारणामुळे वायफाय राऊटरला विज मिळते आणि वायफआयचा सिग्नल जनरेट होऊ लागतो. या दगडाचे वजन सुमारे १.५ टन इतके आहे. या दगडाला कीपएलाईव असे नाव देण्यात आले आहे.

दरम्यान, एरम बर्थोल नावाच्या एका व्यक्तिने हा राऊटर बनवला आहे. वायफाय जनरेटरचे फोटो सध्या सोशल मीडियात जोरदार धुमाकूळ घालत असून, ते मोठ्या प्रमाणावर शेअर करण्यात येत आहेत. या प्रकारामुळे या म्यजियमलाही सध्या चांगले दिवस आले असून, हे राऊटर पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने उपस्थिती लावत आहेत. जिज्ञासू पर्यटकांना या ठिकाणी स्वत: आग लाऊन प्रयोग करायला सांगितले जाते. पर्यटक या वायफायला आपला फोनही कनेक्ट करू शकतात.

Leave a Comment