शेकडो आकाशगंगा दडल्या ‘मिल्की वे’ मागे

milkyway
मेलबर्न – पृथ्वीपासून केवळ २५ कोटी प्रकाश वर्ष दूर अंतरावर असलेल्या शेकडो आकाशगंगांचा शोध वैज्ञानिकांनी लावला असून या सर्व आकाशगंगा आतापर्यंत आपल्या आकाशगंगा ‘मिल्की वे’च्या मागे लपून होत्या.

या संशोधनामुळे गुरुत्वाकर्षणातील अनियमितता आणि लाखो-अब्ज सुर्याच्या बरोबरेने गुरुत्वाकर्षण असलेल्या शेकडो-हजारो अन्य आकाशगंगाचा अभ्यास करता येईल. तारे आणि मिल्की वेच्या पुढेही संशोधन करण्यात ऑस्ट्रेलियामध्ये ‘कॉमनवेल्थ सायंटिफिक अँड इंडस्ट्रीयल रिसर्च ऑर्गनायझेशन’ (सीएसआयआरओ)च्या एका शक्तिशाली लेन्स पार्क्स रेडियो टेलिस्कोपच्या मदतीने वैज्ञानिकांनी यश मिळवले.

‘आयसीआरएआर’चे मुख्य केंद असलेल्या ‘युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया’चे प्राध्यापक लिस्टर स्टेवली-स्मिथ यांच्या मते, ८३३ आकाशगंगांचा शोध लावण्यात यश मिळाले आहे. ज्यापैकी एक तृतीयांश आकाशगंगांना पहिल्यांदा कधीच पाहण्यात आले नव्हते. स्टेवली-स्मिथ यांच्या मते, वैज्ञानिकांनी १९७० आणि १९८० च्या दशकात ब्रम्हांड विस्ताराच्या कारणामुळे झालेल्या बदलानंतर या आकाशगंगांचा शोध लावण्याचे काम सुरू होते. या आकाशगंगांमध्यें अनेक मोठय़ा समूहाचे महाझूंड आहेत. आपली आकाशगंगा २० लाख किलोमीटर प्रति तासापेक्षा अधिक वेगाने परिभ्रमण करते.

यामुळे अनेक नव्या संरचनांचा शोध लागल्याने एनडब्ल्यू २, एनडब्ल्यू ३ आणि एनडब्ल्यू ३ तसेच नवीन सीडब्ल्यू १, सीडब्ल्यू २ सहित ‘मिल्की वे’चे परिभ्रमणबाबत अधिक माहिती मिळेल, असे स्टेवली-स्मिथ यांनी सांगितले. दक्षिण आफ्रिकेच्या ‘युनिर्व्हसिटी ऑफ केपटाऊन’चे प्राध्यापक रेनी क्रानकोर्टवेग यांनी सांगितले की, सरासरी एका आकाशगंगेत १०० अब्ज तारे असतात, यामुळे ‘मिल्की वे’च्या मागे लपलेल्या शेकडो नवीन आकाशगंगांचा शोध लावणे महत्त्वाचे ठरले आहे.

Leave a Comment