रेल्वेचे तिकीट आता ‘जुगाड’ अॅपमुळे कन्फर्म करणे आणखी सोपे!

ticket
नवी दिल्ली : रेल्वे प्रवाशांना आता आपले तिकीट एजंट आणि रिझर्व्हेशन क्लार्ककडून कन्फर्म करुन घेण्याचा त्रास वाचणार असून तुम्ही आता घरच्या घरी लॅपटॉप किंवा कम्प्युटरवरुन असे रेल्वेस्थानके शोधू शकता, जिथे तुम्हाला कन्फर्म तिकीट मिळू शकते.

एक मोबाईल अॅप आयआयटी खडगपूर आणि एनआयटीच्या दोन विद्यार्थ्यांनी बनवले असून जे कन्फर्म तिकीटसाठी जवळील योग्य रेल्वेस्थानक सूचवू शकेल. म्हणजे हे अॅप तुमचे तिकीट एजंट बनणार आहे. या अॅपचे नाव ‘टिकेट जुगाड’ असे आहे. आतापर्यंत तुम्हाला रेल्वे तिकीट केवळ आयआरसीटीसीच्या वेबसाईटवर किंवा अॅपवर मिळत होती, तीही जर उपलब्ध असेल तर. मात्र, आता या नव्या अॅपमुळे कन्फर्म तिकीट मिळण्याची शक्यता जास्त आहे.

प्रत्येक रेल्वेस्थानकाला तिकीट बुकिंगसाठी ठराविक कोटा निश्चित केलेला असतो. उदाहरणार्थ- जर तुम्हाला मुंबई ते दिल्ली असा प्रवास करायचा आहे. मात्र, तुमच्याकडे कन्फर्म तिकीट नसेल, तर तुम्ही या अॅपच्या माध्यमातून पुढील कोणत्या स्थानकावरुन कन्फर्म तिकीट मिळू शकते का, ते पाहू शकता. म्हणजेच हे अॅप तुम्हाला कन्फर्म तिकीट मिळू शकेल, अशा रेल्वे स्थानकांची नावं सूचवणार आहे.

हे अॅप आयआयटी खडगपूरमध्ये द्वितीय वर्षात शिकत असलेल्या रुणाल जाजू आणि त्याचा चुलत भाऊ शुभम बलदावा यांनी बनवले आहे. त्यांच्या या अॅपमुळे लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्यांच्या तिकिटासंबंधीच्या अडचणी दूर होणार आहेत. त्यामुळे हे अॅप अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. या अॅपला प्रमोट करण्याची जबाबदारी आयआयटीच्या उद्योगासंबंधी विभागाने स्वीकारली आहे. या अॅपला आयआयटी खडगपूरच्या वार्षिक ग्लोबल बिझनेस मॉडेल कॉम्पिटिशनमध्ये दीड लाख रुपयांचे बक्षीसही जाहीर केले आहे.

Leave a Comment