राजन यांना सतावत आहे डोश्याच्या वाढत्या किंमतीची चिंता

raghuram-rajan
नवी दिल्ली : डोसा हा दक्षिण भारतीय स्वादिष्ट असा पदार्थ आहे. जगभरात मोठ्या चवीने आज तो खातात. एवढेच नाही तर डोसा जुन्या पद्धतीने बनविण्यातच खरी चव आहे. पण आपणास आश्चर्य वाटेल की, भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांना डोश्याच्या वाढत्या किंमतीची चिंता सतावत आहे.

सध्या डोसा महाग का होत आहे, याबद्दल रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी मंथन मांडले आहे, हो हे खरे आहे. आरबीआय महागाई कमी असल्याचा दावा करते मात्र त्यानंतरही डोश्याच्या किंमती का वाढत आहेत? असा प्रश्न त्यांना विचारला गेला तेव्हा डोश्याच्या किंमती वाढण्यास तवा जबाबदार असल्याचे त्यांनी सांगितले.

कोचीमध्ये फेडरल बँकेच्या एका कार्यक्रमात काही इंजीनियर विद्यार्थ्यांनी महागाई दर घटतो आहे. मात्र डोश्याच्या किंमती का वाढत आहेत, असा सवाल केला. या प्रश्नावर उत्तर देताना, डोसा बनवण्यासाठी आजही त्याच तव्याचा वापर होतो आहे. कोणतीही नवी टेक्नॉलॉजी वापरली जात नाही. यामुळेच डोश्याच्या किमती सतत वाढत आहेत, असे राजन म्हणाले. बँकिंकसह अनेक क्षेत्रे आहेत जिथे टेक्नॉलॉजीमुळे काम सोपे आणि उत्पादन अधिक होऊ लागले. परदेशातील अनेक अशी क्षेत्रे आहेत जिथे टेक्नॉलॉजीचा वापर होत नाही साहजिकच त्याचा उत्पादनावर परिणाम होतो. डोश्यांबाबतही हेच आहे.

आज देखील व्यक्ती तांदुळाचे मिश्रण तव्यावर टाकतो, पसरवतो आणि त्यावर मसाला टाकून तयार करून ठेवतो. या कामात कोणतेही तंत्रज्ञानाचा वापर नाही. उलट डोसा बनविणा-याचे वेतन मात्र विशेष करून केरळ राज्यात वाढत आहे. कामगारांचा उपयोग अनेक उत्पादन क्षेत्रात केला जात आहे. जिथे उत्पादकता अधिक आहे, तिथे कामगारांचा अधिक उपयोग होतो. जसे की कारखान्याचे काम, बँकिंग क्षेत्र. बँक लिपिक तंत्रज्ञानामुळे अधिक लोकांना सेवा सुविधा देत आहे.

Leave a Comment