येत्या मार्चमध्ये बाजारात येणार अॅपलचा आयफोन ५एसई

iphone
न्यूयॉर्क : येत्या मार्चमध्ये ग्राहकांच्या भेटीला अॅपलचा बहुचर्चित बजेट आयफोन ५एसई आणि आयपॅड एअर ३ येत असून एका शानदार इव्हेंटमध्ये १५ मार्चला आयफोन ५एसईचे लाँचिंग होत आहे आणि १८ मार्चला हा फोन स्टोअर्समध्ये आणि ऑनलाईन उपलब्ध होण्याची चर्चा आहे.

या वृत्ताला अॅपलकडून अद्याप अधिकृत दुजोरा मिळाला नसला तरी चर्चांना उधाण आले आहे. एका वेबसाईटच्या वृत्तानुसार अॅपल नव्या प्रॉडक्ट्सच्या लाँचिंगच्या गडबडीत असून त्याचप्रमाणे अॅपल प्री-ऑर्डर घेणार नसून लाँचिंगनंतर ३ दिवसांत विक्री सुरु होईल.

आयफोन ५एसईची किंमत ५०० डॉलर म्हणजे अंदाजे ३० हजार रुपयांच्या घरात असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आयफोन ५एसईमध्ये ६४ बीट ए८ प्रोसेसर आणि १ जीबी रॅम आहे. ४ इंचांच्या रेटिना डिस्प्लेसोबत एनएफसी आणि टच आयडी हे फीचर्स अॅड करण्यात आले आहेत. आयफोन ५एसच्या तुलनेत ५एसई पातळ आणि कमी वजनाचा असेल, असेही म्हटले जाते. आयफोन ६एस सारखी २.५ डी कव्हर ग्लास हे बजेट आयफोनचे वैशिष्ट्य असेल. आयफोनचा फ्रंट कॅमेरा ८ मेगापिक्सलचा असून रोज गोल्डप्रमाणे आयफोनच्या नेहमीच्या रंगांमध्ये उपलब्ध असेल. ५एस प्रमाणेच ५एसईला अॅनॉडाईज्ड अॅल्युमिनियम फिनीश असेल. येत्या फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात आयफोन ५एसई उपलब्ध होईल, असे म्हटले जाते.

Leave a Comment