पित्यावर लेकीने केले अंत्यसंस्कार

girl
ठाणे – बदलापूरमधील एका सावित्रीच्या लेकीने पारंपारिक प्रथा आणि रुडी बाजूला सारून वडिलांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केल्याची घटना केल्याने मुलगा आणि मुलगी असा भेदभाव करु नये असा एक प्रकारचा सामाजिक संदेशच समाजाला मिळाला आहे.

अनेक महिन्यापासून बदलापूर येथील अष्टविनायक पार्कमध्ये राहणारे दिलीप गुर्जर हृदयविकाराने आजारी होते. त्यांना तीन मुली असून दोन मुलींची लग्न झाली आहेत. दिलीप गुर्जर यांचे अचानक निधन झाल्यावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार कोण करणार असा प्रश्न त्यांच्या नातेवाईकांना पडला. त्याच वेळी दिलीप गुर्जर यांची मोठी मुलगी वडिलांच्या पार्थिवाचे अंत्यसंस्कार करण्यासाठी पुढे आली. आपल्या वडिलांच्या अंत्यसंस्कार दिपिका गुर्जर या मुलीने प्रसंगी धाडसाने न घाबरता अंत्यविधिचे कार्य स्मशानभूमीमध्ये पूर्ण करत पित्याच्या पार्थिवाला अग्नि दिला. दीपिकाने घेतलेल्या निर्णयाचे समर्थन त्यांच्या नातेवाईकांनी केले असून आपल्याकडे अजुनही मुलाने अग्नि देणे व अंत्यविधिची कामे पार पाडणे अशी प्रथा आहे. मात्र दीपिकाला या निर्णयामुळे समजात मुलगा आणि मुलगी असा भेदभाव करु नये असा संदेशच समाजाला मिळाला आहे.

दरम्यान, १८ व्या शतकात सावित्रीबाई फुले यांनी त्यांचे पती महात्मा फुले यांच्यावर त्याकाळात अंत्यसंस्कार केले होते. त्या पहिल्या पुरोगामी महिला ठरल्या होत्या. त्यानंतर शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांनी त्यांच्या वडिलांवर अंत्यसंस्कार केले होते. अलीकडील काळात गोपीनाथ मुंढे यांची कन्या पंकजा मुंढे यांनीही वडिलांच्या पार्थिवाला अग्नी दिला आणि आता बदलापूर सारख्या गावात राहणारी दीपिका या तरुणीचा चर्चा विषय ठरला असून तिच्या पुरोगामीचे अवलंबन महाराष्ट्रातील इतर महिला घेतली का ? अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Leave a Comment