गुंतवणूकदारांना अधिकाधिक सुविधा देणारा असेल अर्थसंकल्प

suresh-prabhu
तिरुवअनंतपुरम : सध्याच्या आणि भविष्यातील रेल्वे सुविधांच्या विस्तार कार्यावर आणि अधिकाधिक गुंतवणूक वाढविण्यावर २०१६-१७ मधील रेल्वे अर्थसंकल्प केंद्रीत असेल, असे संकेत रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी दिले. त्यामुळे गुंतवणूकदारांना अधिकाधिक सुविधा देणारा अर्थसंकल्प म्हणूनच याकडे पाहिले जाऊ शकते. परंतु प्रवाशांच्या दृष्टीने कोणते निर्णय घेतले जाणार, याकडेही सर्वांची नजर आहे.

रेल्वे मंत्र्यांच्या येथील रेल्वे स्थानकावर प्रवाशांसाठी सुविधांचा विस्ताराचे उद्घाटन हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. प्रवाशांसाठी आरामदायी प्रवास ही काळाची गरज बनली आहे. परंतु सुविधांचा विस्तार भविष्याची गरज आहे. त्यादृष्टीने सरकार आता विचार करीत आहे. बजेटमध्येही त्याचीच प्रचिती येईल. केंद्र सरकारने आता बजेटला अंतिम रूप द्यायला सुरुवात केली आहे. रेल्वेच्या विकासासाठी सुरू केलेले उपाय पुढील वर्षीही जारी राहतील, असेही प्रभू यांनी यावेळी सांगितले. भाजप सरकारने गेल्या वर्षीच्या बजेटमध्ये ज्या काही घोषणा केल्या होत्या. त्या ब-यापैकी पूर्ण केल्या आहेत. गेल्या दशकभरापासून रेल्वेकडे दुर्लक्ष केले आहे. त्यातूनच गुंतवणूक कमी झाली आहे.

त्यामुळेच आता गुंतवणूक वाढविण्याचा प्रयत्न केला जात आहे. भारतीय रेल्वे देशाच्या अर्थव्यवस्थेला गती देण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करीत अहोत. हे प्रयत्न नक्कीच यशस्वी होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. राज्यांतील रेल्वेच्या विविध योजनांबद्दल बोलताना प्रभू यांनी केंद्र सरकारने एक नवा कार्यक्रम हाती घेतला आहे.

Leave a Comment