बद्रीनाथ मंदिर ११ मे रोजी उघडणार

badrinath
ऋषिकेश : प्रमुख तीर्थक्षेत्रांपैकी एक असलेल्या भगवान बद्रीनाथ मंदिर उघडण्याची शुभ तिथी निश्चित झाली असून, वसंत पंचमीच्या निमित्ताने त्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यानुसार ११ मे रोजी मंदिर दर्शनासाठी उघडण्यात येणार आहे. त्यावेळी दर्शनासाठी भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणात होऊ शकते. टिहरी जनपदच्या नरेंद्रनगर येथील राजमहालात बंदरी केदार मंदिर समितीच्या सदस्यांची बैठक झाली.

या बैठकीत राज पुरोहित यांनी महाराजा मनुजेंद्र शहा यांची जन्मकुंडली काढून शुभ मुहूर्त निश्चित केला. त्यानुसार ११ मे २०१६ रोजी मंत्रोच्चारासोबत पहाटे साडेचार वाजता बद्रीनाथ देवस्थानचे कपाट उघडण्यात येणार आहे, असे सांगण्यात आले. या वेळी टिहरीचे खासदार माला राजलक्ष्मी आणि बदरी केदार मंदिर समितीचे अध्यक्ष गणेश गोदियालसह समितीचे अन्य सदस्य उपस्थित होते. बद्रीनाथधामचे कपाट उघडण्याची धार्मिक प्रक्रिया दोन दिवसांअगोदर बुधवारी सुरू केली होती.

पांडुकेश्वरमध्ये पूजा-अर्चा केल्यानंतर गाडुघडी यात्रेने टिहरी राजदरबाराकडे प्रस्थान ठेवले. तत्पूर्वी डिम्बरगावात पंचपूजा केल्यानंतर डिमरी पंचायतच्या सनतकुमार डिमरी, ज्योतिष डिमरी, अरविंद आणि हेमचंद्र डिमरी, नृसिंह मंदिर, जोशीमठ मार्गे ही यात्रा पांडुकेश्वरकडे रवाना झाली होती. परंपरेनुसार पांडुकेश्वर योग धान्य मंदिर आणि कुबेर चौकात भागवत पवार यांच्यासह तीर्थ पुरोहित आणि शेकडो ग्रामस्थांनी मिळून शंखध्वनीसह पूजा केली. वसंत पंचमीच्या निमित्ताने बदरी विशालचे कपाट उघडण्याची तिथी परंपरेप्रमाणे घोषित करण्यात आली. याकडे लाखो भाविकांचे लक्ष असते. त्यानुसार बद्रीनाथ यात्रेचे नियोजन केले जाते.

Leave a Comment