प्रवासादरम्यान वैद्यकीय मदत करणार रेल्वेचे नवे अॅप

railyatri
नवी दिल्ली – रेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशांना लागणारी आपत्कालीन वैद्यकीय मदतीसाठी आज मोबाईल अॅप लाँच केले आहे. या अॅपच्या मदतीने प्रवाशी आपल्या जवळपास आवश्यक उपलब्ध वैद्यकीय मदतीची माहिती मिळवू शकतो.

आयटी क्षेत्रातील एक स्टार्ट-अप रेलयात्रीडॉटइनने हे मोबाईल अॅप लाँच केले आहे. या कंपनीने एक प्रसिद्धीपत्रक काढून याबाबतची माहिती दिली आहे. त्याचबरोबर या पत्रकात रेल्वे स्टेशनवर उपलब्ध आरोग्य सुविधांची यादी आणि प्रवास दरम्यानच्या जवळपासच्या हॉस्पिटल आणि रुग्णवाहिकांचे फोन नंबर देखील अॅपमध्ये देण्यात आले आहे.

Leave a Comment