नवीन कल्पना सुचविणार्‍याना इन्फोसिस देणार पारितोषिके

infi
देशातील नंबर दोनची सॉफटवेअर निर्यात कंपनी इन्फोसिसने मेक इन इंडिया मोहिमेला प्रोत्साहन देण्यासाठी रोजच्या जीवनातील समस्यांवर उपाय सुचविणार्‍या २० कल्पकांना प्रत्येकी ५ लाख रूपयांचा पुरस्कार देण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. यामुळे समस्या सुटण्यासाठी नवीन कल्पनांवर विचार करण्यास प्रोत्साहन मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

इन्फोसिसचे अधिकारी प्रवीण राव या संदर्भात म्हणाले, या मोहिमेत १८ वर्षांवरील कुणीही आपले विचार मांडू शकणार आहेत. लोकांनी सूचविलेल्या कल्पनांवर ज्युरी चर्चा करतील व जी कल्पना व्यवहार्य आणि वर्तमानातील समस्येंवर उपाय सुचविणारी असेल त्यांना पुरस्कार दिला जाईल. त्याची सुरवात मार्च महिन्यापासून होत असून इच्छुकांनी १ ते १५ एप्रिल दरम्यान त्यांच्या कल्पना इंफि मेकर अॅवॉर्ड साईटवर स्पर्धक म्हणून पाठवायच्या आहेत.

Leave a Comment