राजस्थानमध्ये जन्मले तीन पाय असलेले बाळ - Majha Paper

राजस्थानमध्ये जन्मले तीन पाय असलेले बाळ

baby
राजस्थान : एका महिलेने तीन पाय असलेल्या मुलीला राजस्थानच्या एका सरकारी रुग्णालयात जन्म दिला असून आई आणि बाळ दोघीही सुखरुप आहेत. पण डॉक्टरही नवजात बाळाला पाहून हैराण झाले आणि याची माहिती तातडीने नातेवाईकांना दिली.

हे बाळ भगोरा गावातील राजेंद्र आणि रोशनी कटारा या दाम्पत्याला झाले आहे. रोशनीचे हे पहिलेच बाळंतपण असून गुरुवारी रोशनीला पोटात दुखू लागल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. शुक्रवारी रोशनीची प्रसुती डॉ. जनकराज सोनी आणि मेल नर्स रमेश बारिया यांनी केली. पण नवजात बाळाला पाहून डॉक्टरांनाही धक्का बसला. बाळाचे दोन्ही पाय सामान्य आहेत, पण तिसरा पाय पाठीच्या कण्याला गाठोड्यासारखा दिसत आहे. त्यात तिसरा पाय आहे. दरम्यान आई आणि बाळाला तातडीने बांसवाडातील रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. पण तीन पाय असलेल्या मुलीचा जन्म हा गावात चर्चेचा विषय बनला आहे.

Leave a Comment