जगात सर्वात जास्त विकली जाते बीएमडब्ल्यूची आय८ स्पोर्ट्सकार

bmw
नवी दिल्ली – बीएमडब्ल्यूची आय ८ जगातील सर्वात जास्त विकली जाणारी हायब्रिड स्पोर्ट्सकार बनली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मागील वर्षी या हायब्रिड कारची एकूण ५,४५६ युनिट्स विकल्या गेल्या आहेत. या कारला कंपनीने पहिल्यांदा २०१३साली फ्रँकफर्ट ऑटो शोमध्ये सादर करण्यात आले होते. त्यानंतर ऑगस्ट २०१४मध्ये या कारची विक्री सुरु करण्यात आली होती.

भारतात ही कार २०१४च्या ऑटो एक्स्पोमध्ये सादर करण्यात आली होती. त्यानंतर २०१५च्या फेब्रुवारीमध्ये याची भारतात विक्री सुरु झाली. बीएमडब्‍ल्‍यू आय ८ एक २ प्लस २ सीटर स्पोर्ट्सकार आहे. ज्यात प्‍लगइन हायब्रिड सिस्‍टममध्ये टर्बोचार्ज्‍ड ट्विन पावर टर्बो पेट्रोल इंजन आणि इलेक्ट्रिक ड्राइव सिस्टम लावण्यात आले आहे.