मायक्रोमॅक्सने लाँच केला ‘कॅनवास ज्यूस ४जी’

micromax
नवी दिल्ली : ‘कॅनवास ज्यूस ४जी’ हा नवीन स्मार्टफोन स्मार्टफोन क्षेत्रातील आघाडीची कंपनी ‘मायक्रोमॅक्स’ने लाँच केला असून हा फोन कंपनीच्या ऑफिशियल वेबसाइटवर लिस्टेड करण्यात आला आहे. मात्र, अद्याप या फोनची किंमत जाहीर करण्यात आलेली नाही.

कसा आहे मायक्रोमॅक्सचा कॅनवास ज्यूस ४जी – यात ५ इंचाचा एचडी डिस्प्ले देण्यात आला असून त्याचे रिझोल्यूशन ७२०x१२८० पिक्सल आहे. याचे ऑपरेटींग सिस्टिम अँड्रॉईड ५.१ लॉलीपॉप बेस असून यात १ गीगाहर्टज क्वॉडकोरचा प्रोसेसर देण्यात आला आहे. त्याचबरोबर यात २ जीबी रॅम, ४ जीबीची इंटरनल स्टोअरेज आणि त्याची क्षमता ३२ जीबीपर्यंत वाढवता येऊ शकते. या फोनमध्ये ८ मेगापिक्सलचा रिअर आणि ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. यात ब्लूटय़ूथ, ३ जी, ४जी, वाय-फाय, जीपीएस अशा कनेक्टीव्हीटी देखील देण्यात आल्या आहेत.

Leave a Comment