पतंजलीत नोकरीसाठी बड्या कंपन्यांचे अधिकारी प्रयत्नशील

patanjali
हरद्वार- योगगुरू रामदेवबाबा यांच्या पतंजली आयुर्वेदने बड्या एफएमसीजी कंपन्यांचे मार्केट काबीज करण्याचा धडाका लावला असतानाच आता या कंपन्यांतील अनुभवी व बडे अधिकारीही पतंजलीकडे येत असल्याचा अनुभव येऊ लागला आहे. गेल्या ६ महिन्यात किमान २५० एक्झिक्युटीव्ह ग्रेडचे अधिकारी पतंजलीत जॉईन झाले असल्याचे समजते. यात हिमालया, डाबर, इमामी या स्थानिक कंपन्यांबरोबरच प्रॉक्टर अॅन्ड गँबल, हिदुस्थान युनिलिव्हर अशा बड्या कंपन्यांतील अधिकार्‍यांचाही समावेश आहे.

यातील कांही अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार पतंजलीचे वर्ककल्चर अन्य कंपन्यांप्रमाणेच आहे. कांही जणांनी रामदेवबाबांच्या प्रभावामुळे पतंजली जॉईन करण्याचा निर्णय घेतला आहे तर कांही जणांनी चांगल्या करियर संधीसाठी ही नोकरी स्वीकारली आहे. पतंजलीचे व्यवस्थापकीय संचालक बाळकृष्ण यांच्या म्हणण्याप्रमाणे पतंजलीकडे नोकरीसाठी अनुभवी व वरीष्ठ अधिकारी पदावरील लोकांकडून अर्ज येण्याचे प्रमाण खूपच वाढले आहे. मात्र येथे नोकरी देताना दोन मुख्य अटी आहेत त्या म्हणजे, उमेदवाराला दारू, सिगरेट अशी व्यसने असता कामा नयेत आणि तो सात्विक प्रवृत्तीचा असायला हवा. बाकी पगार वगैरे अन्य कंपन्यांनुसारच दिले जातात असेही समजते.

Leave a Comment