गुगलचे सेल्फ ड्रायव्हिंग ट्रकसाठी पेटंट

truck
सेल्फ ड्रायव्हिंग कारला अमेरिकन सरकारने परवानगी दिल्यानंतर गुगलने सेल्फ ड्रायव्हीग डिलीव्हरी ट्रक बनविण्यासाठीचे पेटंट घेतले आहे. हा ट्रक ग्राहकाकडे स्वतःच जाऊन मालाची डिलिव्हरी देईल.

पेटंट कागदपत्रांनुसार या ट्रकमध्ये लॉकर्स असतील आणि जीपीएसच्या मदतीने तो चालेल. ग्राहकाला डिलिव्हरी घेण्यासाठी लॉकर उघडताना सिक्रेट कोडचा वापर करावा लागेल.क्रेडीट कार्ड व निअर फिल्ड कम्युनिकेशनच्या मदतीने हा कोड वापरता येईल. त्यासाठी एक अॅप स्मार्टफोनवर दिले जाईल. या ट्रकची स्पर्धा अॅमेझॉनच्या ड्रोन डिलीव्हरीशी असली तरी अॅमेझॉन हवेतून तर गुगल रस्तामार्गाने ग्राहकांना डिलीव्हरी देणार आहेत. अर्थात ड्रोन डिलीव्हरीत ठराविक वजनाचे सामानच देता येईल तर ट्रकसाठी कितीही वजनाचे सामान वाहून नेता येणार आहे.

Leave a Comment