इपीएफओतर्फे यंदा बोनस

epfo
कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी संघ यंदाच्या वर्षात म्हणजे २०१५-१६ साठी सदस्यांना ७५० कोटी रूपयांचा बोनस देण्याबाबत विचार करत असून या संघटनेच्या इतिहासात प्रथमच असा बोनस दिला जाणार आहे. ईपीएफओ व्याजदर वाढविण्यापेक्षा असा बोनस देणार असून सध्या या योजनेचा व्याजदर ८.९५ टक्के इतका आहे.

ईपीएफओ ट्रस्टी व भारतीय मजदूर संघाचे सचिव पी.जे.बनसुरे या संदर्भात माहिती देताना म्हणाले की ईपीएफओला यंदाच्या वर्षात ३४८४४ कोटी रूपयांची कमाई झाली आहे. त्यामुळे आम्ही आमच्या सदस्यांना ९ टकके व्याज देऊ शकतो. मात्र केंद्र सरकारच्या वित्त विभागाने त्याबाबत अनुकुलता दर्शविलेली नाही. वित्त मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार पीएफचे व्याजदर वाढले तर अन्य सेव्हींग योजनांवरचे व्याजदरही वाढवावे लागतील व भविष्यात अशी व्याजदर वाढ शक्य होणार नाही. त्यामुळे वन टाईम बोनसचा पर्याय निवडण्याबाबत विचार सुरू आहे. अर्थात ज्यांनी वर्षभर नियमित पैसे भरले आहेत, त्यांनाच हा बोनस दिला जाणार आहे. सध्या प्रॉव्हीडंट फंडाचे ५ कोटी सदस्य आहेत.

Leave a Comment