रिलायन्सने ऑनलाइन स्टोअर्सवर लिस्ट केले ४जी स्मार्टफोन्स

reliance-jio
मुंबई – गेल्या महिन्यात लॉन्च केलेल्या आपल्या लायफ ब्रॅंडच्या ४जी स्मार्टफोनच्या किमतीची रिलायन्स जिओने घोषणा केली असून कंपनीने तिन्ही स्मार्टफोन लायफ अर्थ १, वॉटर १ आणि वॉटर २ आपल्या अधिकृत ऑनलाइन स्टोअर्सवर लिस्ट केले आहेत. कंपनीने आपल्या वेबसाईट न्यू फोनचे फीचर्स व स्पेसिफिकेशन्सबाबतही माहिती दिली आहे. मात्र, हे फोन बाजारात कधी उपलब्ध होतील, याबाबत माहिती दिली नाही.

जानेवारी रिलायन्स जिओने माहिन्यात एकाच वेळी तीन ४जी स्मार्टफोन लॉन्च करून बाजारात पदार्पण केले होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, देशातील १३ शहरांत रिलायन्स आपले स्मार्टफोन फेब्रुवारी महिन्यात उपलब्‍ध करून देणार आहे.
reliance-jio1
कसा आहे लायफ अर्थ १ – डिस्प्ले – ५.५ इंच, फुल एचडी (१०८०×१९२० पिक्सेल) एमोलेड >प्रोसेसर: ऑक्टाकोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ६१५ (MSM8939) > रॅम: ३ जीबी > मेमरी : ३२जीबी इनबिल्ट (मायक्रो एसडी कार्डने ३२ जीबी एकस्पांडेबल) > कॅमेरा – रिअर १३ मेगापिक्सल व फ्रंट ५ मेगापिक्सल > कनेक्टीव्हिटी: ४ जी एलटीई, वायफाय, ब्‍लूटूथ ४.० आणि जीपीएस > ऑपरेटिंग सिस्टम : अँड्रॉइड ५.१.१ लॉलीपॉप > बॅटरी: ३५०० एमएएच.
reliance-jio2
कसा आहे लायफ वॉटर १ – डिस्प्ले : ५ इंच, एचडी (१९२० x१०८० पिक्सेल) >प्रोसेसर: १.५ GHz ऑक्टाकोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ६१५ (MSM8939) > रॅम: २ जीबी > मेमरी : १६जीबी इंटरनल (मायक्रो एसडी कार्डने ३२ जीबी एकस्पांडेबल), कॅमेरा – रिअर १३ मेगापिक्सल व फ्रंट ५ मेगापिक्सल > कनेक्टीव्हिटी: २जी, ३जी, ४जी एलटीई > ऑपरेटिंग सिस्टम : ५.१.१ लॉलीपॉप > बॅटरी: २६०० एमएएच.
reliance-jio3
कसा आहे लायफ वॉटर २ – डिस्प्ले : ५ इंच, एचडी (१२८० x७२० पिक्सेल) >प्रोसेसर: १.५ GHz ऑक्टाकोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ६१५ (MSM8939) > रॅम: २ जीबी > मेमरी : १६जीबी इंटरनल (मायक्रो एसडी कार्डने ३२ जीबी एकस्पांडेबल), कॅमेरा – रिअर १३ मेगापिक्सल व फ्रंट ५ मेगापिक्सल > कनेक्टीव्हिटी: २जी, ३जी, ४जी एलटीई > ऑपरेटिंग सिस्टम : अॅंड्रॉइड व्ही ५.०.२ लॉलीपॉप > बॅटरी: २४०० एमएएच.

Leave a Comment