या पाच देशात व्हॅलेंटाईन डेला आहे बंदी

valentine
जगभरात लव्ह अॅक्टीव्ह करणार्‍या व्हॅलेंटाईन डेच्या सेलिब्रेशनची तयारी जोरात सुरू असली तरी जगातील कांही देशात हा सण साजरा करण्यावर बंदी आहे. ही बंदी तेथील सरकार अथवा तेथल्या नागरी संघटनांनी घातली आहे. या दशात मलेशिया, इंडोनेशिया, इराण, सौदी या कट्टर देशांचा समावेश आहे तसेच रशियातील बेलगोरोड प्रांत व फ्लोरिडातील शाळा यांचाही समावेश आहे. विशेष म्हणजे नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तान सरकारही या सणावर बंदी घालण्याच्या विचारात असल्याचे समजते.

मलेशियात ६० टक्के मुस्लीम समाज आहे व त्यामुळे इस्लामविरोधी म्हणून व्हेलेंटाईन डे साजरा करण्यास बंदी असून नियम मोडणार्‍यांना तुरूंगात टाकले जाते. इराणमध्ये या दिवशी लाल रंगाचे गुलाब, लाल रंगाच्या वस्तू, हार्ट शेप वस्तू व या सणाच्या संबंधीच्या कोणत्याही वस्तू विक्री खरेदीवर बंदी आहे. नियम मोडणार्‍याला दंड व तुरूंगात टाकण्याची तरतूद आहे. रशियातील बेलगोरोड प्रांतातही या सणावर बॅन लावला गेला असून २०११ सालापासून ही बंदी लागू आहे. हा सण म्हणजे परदेशी फॅड आहे व त्यामुळे तो शाळा, महाविद्यालये व अन्य संस्थांतही साजरा करण्यावर बंदी आहे.

सौदीत या सणानिमित्ताने सुटी देण्यासही विरोध आहे. तेथील रूढीवादी संघटना हा सण साजरा करण्याच्या विरोधात असून १४ फेब्रुवारी येण्यापूर्वीच गुलाब, लांल रंगाच्या वस्तू, लव्हथीम कार्डस विक्रीवर बंदी घातली जाते. मात्र त्यामुळे येथे या वस्तूंचा जोरदार काळाबाजार होतो असेही समजते. इंडोनेशियात मुस्लीम मौलवींनी या सणावर बंदी घातली आहे मात्र तरीही तेथीत प्रेमिक हा सण चोरून साजरा करतात इतकेच नाही तर बंदी विरोधात निदर्शनही करतात. फ्लोरिडा राज्यातही या सणावर शाळांनी बंदी घातली असून हा सण येथे सार्वजनिक स्वरूपात साजरात करता येत नाही. शाळांतून फुले, टेडी अशा वस्तू आणण्यावर प्रतिबंध लावला जातो व तो मोडला तर संबंधित वस्तू जप्त केल्या जातात.