झुकेरबर्ग भारतविरोधी टिप्पणीमुळे नाराज

mark
न्यूयॉर्क – नेट न्यूट्रॅलिटीच्या टेलीकॉम रेग्युलेटरी अथॉरिटीने (ट्राय) बाजूने कौल दिल्याने फेसबूकला मोठा झटका बसला असून फेसबूक कंपनीच्या संचालक मंडळातील सदस्य मार्क अँडरसनने फ्री बेसिक्सची महत्त्वाकांक्षी योजना अडकल्याचे शल्य डाचत असल्याने भारताबद्दल अतिशय अपमानास्पद टिप्पणी करत आपला राग व्यक्त केला आहे. वसाहतवादी धोरणांच्या विरोधात हा निर्णय असून जर ब्रिटीशांच्या सत्तेखाली भारत असता तर त्याचे कल्याण झाले असते, असे अपमानास्पद ट्विट केले. मात्र मार्क अँडरसनच्या या वक्तव्यावर फेसबूकचा सहसंस्थापक मार्क झुकेरबर्गने तीव्र नाराजी दर्शवत आपण त्याच्याशी सहमत नसल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र अँडरसनच्या या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर संतापाची तीव्र भावना आहे.

फेसबुकच्या संचालक मंडळात मार्क अंडरसन हे असून फ्री बेसिक्स भारतात लागू करता आले नाही याचा राग त्यांच्या मनात आहे. भारताचा इंटरनेट टेरिफबाबत निर्णय योग्य नाही. ब्रिटिश अमलाखाली हा देश असता तर त्याची स्थिती अधिक मजबूत झाली असती. कित्येक दशकांपासून भारताचे वसाहतवादाला विरोध केल्याने आर्थिक नुकसान झाले आहे. मग आता हा विरोध कशासाठी? असे ट्विट त्यांनी केले. मात्र त्यांच्या या ट्विटचा सोशल मीडियावर चांगलाच समाचार घेतल्यानंतर त्यांनी तातडीने हे ट्विट काढून टाकले.

मात्र या सर्व टिप्पण्यांबाबत मार्क झुकेरबर्गने असहमती दर्शवत आपली नाराजी स्पष्ट केली. अतिशय दु:खदायक अशी मार्क अँडरसनची ही कॉमेंट असून मी वा फेसबूक (कंपनी) अशा प्रकारे कोणताही विचार करत नसल्याचे त्याने आपल्या पोस्टमध्ये स्पष्ट केले आहे . लोकांना एकमेकांशी जोडण्यासाठी व त्यांचे भविष्य घडवण्यासाठी फेसबूक मदत करत असल्याचेही त्याने म्हटले आहे.

Leave a Comment