गुगलच्या चालकविरहित गाडीला हिरवा कंदील

google
वॉशिंग्टन : गूगलला मोठा दिलासा अमेरिकेच्या वाहन सुरक्षा नियंत्रकांनी दिला असून गूगलचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या सेल्फ ड्रायव्हिंग कार किंवा ड्रायव्हरलेस कार प्रकल्पाला अमेरिकन प्रशासनाने हिरवा कंदिल दाखवला आहे. अमेरिकन आरटीओची ड्रायव्हिंग टेस्ट गूगलच्या कॉम्प्युटर्सनी पास केली आहे.

अमेरिकन वाहन सुरक्षा नियंत्रकांनी गूगलने विकसित केलेले आर्टिफिशीयल इंटेलिजन्स सिस्टीम पायलट प्रकल्पातील ड्रायव्हरलेस कारला ड्रायव्हर म्हणून मान्य करण्यासाठी परवानगी दिली आहे. ड्रायव्हर लेस कारचे तंत्रज्ञान विकसित झाल्यानंतर त्याला प्रशासकीय मान्यता मिळेल का, यावर असलेल्या प्रश्नचिन्हालाही आता विराम मिळाला आहे. ड्रायव्हर लेस कार तंत्रज्ञानासाठी हा एक मोठा विजय मानला जात आहे.

गूगलच्या ड्रायव्हर लेस कारबाबतचा प्रस्ताव अमेरिकेच्या नॅशनल हायवे ट्रॅफिक सेफ्टी अॅडमिनिस्ट्रेशनने ४ फेब्रुवारी रोजी मंजूर केल्यानंतर आज गूगलच्या वतीने आज ही माहिती सार्वजनिक करण्यात आली. गेल्यावर्षी १२ नोव्हेंबर रोजी गूगलने ड्रायव्हर लेस कारलाच एक ड्रायव्हर मानावे आणि ही कार चालवण्यासाठी वेगळ्या मानवी चालकाची आवश्यकता नसल्याचा प्रस्ताव नॅशनल हायवे ट्रॅपिक सेफ्टीकडे दाखल केला होता.

Leave a Comment