महिलांसाठी विशेष योजना आणणार एसबीआय

aruddhati
कोलकाता – महिला उद्योजकांसाठी नवीन विशेष योजना आणण्याच्या प्रयत्नात देशाची सर्वात मोठी बँक असलेली भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) असल्याची माहिती एसबीआयच्या अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य यांनी दिली आहे.

महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी एसबीआय प्रयत्नशील असून त्यांच्यासाठी विशेष योजना आणण्याचा प्रयत्न असल्यामुळे नवीन महिला उद्योजकांना व्यवसाय उभारणे सुलभ होण्यास मदत मिळेल. वर्षभरात १० लाख नवीन कामगार तयार होतात, त्यामध्ये ५० टक्के वाटा महिलांचा असतो. महिला सबलीकरणासाठी एसबीआय प्रयत्नशील आहे. एसबीआयच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये एक महिला कर्मचारी म्हणून अनेकवेळा भेदभाव सहन करावा लागला. महिलांच्या सोबत होणारा भेदभाव संपविण्यासाठी मोठय़ा व्यापक स्तरावर काम करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. माझ्या सारख्या एका महिलेला एसबीआयच्या अध्यक्ष होण्यासाठी मोठा वेळ लागला. या बँकेमध्ये माझ्यासारख्या अनेक महिला आहेत, जे हे पद सांभाळू शकतात, असे त्या म्हणाल्या.

Leave a Comment