वाराणसी- कोलकात्ता दरम्यान गंगेत सी एअरक्राफट सुविधा

seaplane
वाराणसीहून कोलकाता येथे जाण्यासाठी अथवा उलट प्रवासासाठी लवकरच गंगेतून सी एअरक्राफ्ट अथवा अॅफिबियन वाहन सेवा सुरू केली जाणार असल्याचे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. ते म्हणाले देशातील नद्यांमधून १११ वॉटरवेज सुरू करण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प सरकारने हाती घेतला आहे आणि त्यातील ५ वॉटरवेजना परवानगी मिळाली आहे. गोव्यात ९ सीटर सीप्लेनची चाचणी घेतली गेली आहे. लखनौ येथे बोलताना गङकरी यांनी ही माहिती दिली.

नदीतून सुरू करण्यात येत असलेल्या वॉटरवेजमुळे प्रवास स्वस्त आणि जलद होऊ शकेल असे सांगताना गडकरी म्हणाले, वाराणसीपांसून हल्दीया पर्यंत वॉटरड्राफ्ट करण्याचे काम सुरू झाले आहे. यामुळे गंगेत किमान ३ मीटर पाणीपातळी राहणार आहे. गंगा, ब्रह्मपुत्रा नद्यातील पाच वॉटरवेजसाठी परवानगी आली आहे. वॉटरवेजमधून प्रवासासाठी येणारा खर्च किलोमीटरला अवघा १५ ते २० पैसे इतका येईल. या वॉटरवेजमुळे बांग्लादेश आणि म्यानमार या देशांशी व्यापारवाढीस हातभार लागणार आहे. फरक्का ते पाटणा हा ६२० किमीचा मार्ग येत्या ६ महिन्यात तयार होत असून रामेश्वरम ते श्रीलंका दरम्यान अंडरवॉटर बोगद्यासंदर्भातला विचारही सुरू आहे.

Leave a Comment