व्हॅलेंटाईन डेच्या रोझ बुकेची किंमत ९ लाख रूपये

roses
१४ फेब्रुवारीला साजरा होत असलेला व्हॅलेंटाईन डे म्हणजे प्रेमाची कबुली देण्याचा प्रशस्त मार्ग. त्यासाठी आपल्या आवडत्या व्यक्तीला लाल गुलाबाचे फूल देऊन प्रेम व्यक्त करायचे अशी पद्धत. आजकाल या दिवसाच्या निमित्ताने अनेक महागडी गिफट दिली जात असली तरी गुलाब फुलांचे महत्व अबाधित राहिले आहे. यंदाच्या वर्षी या दिवसासाठी सर्वात महागडा रोझ बुके तब्बल ९ लाख रूपयांना विकला जात आहे.

या बुकेत १ हजार गुलाबपुष्पे आहेत आणि ती इक्केडोरियन रोझेस म्हणून ओळखली जातात. इक्वाडोरमधील समुद्रसपाटीपासून १० हजार फुटांवर पहाडी भागात ही शेती होते. येथील थंड हवामानामळे ही फुले हळूहळू वाढतात पण ती पाच फूट उंचीपर्यंत वाढतात. तसेच फुल आकारानेही मोठे असते. एरिना नावाच्या कंपनीकडून ही फुले विकली जातात. ही कंपनी व्हॅलेंटाईन डेची अन्य गिफ्टही विकते. त्यात आयपॅड, शँपेन, लक्झरी कार यांचाही समावेश आहे.

तुम्हालाही तुमच्या व्हेलेंटाईनला इक्वेडोरिन गुलाब बुके द्यायचा असेल व बजेट थोडे कमी असेल तरीही कांही हरकत नाही. याच गुलाबाच्य १५० फुलांच्या बुकेसाठी २ लाख, ५० गुलाबांसाठी ७५ हजार, २४ गुलाबांसाठी ५० हजार मोजूनही तुम्ही ते विकत घेऊ शकता.