रिलायन्सने लॉन्च केला लाइफ फ़्लेम १

reliance
मुंबई – रिलायंस रिटेलने आपला चौथा स्मार्टफोन फ़्लेम १ लॉन्च केला असून ज्याची किंमत कंपनीने ६,४९० रु. ठरवली असून या स्मार्टफोनला कंपनीच्या ऑनलाइन स्टोर रिलायंस डिजिटलवर लिस्ट केले गेले आहे. पण दुर्दैव या फोन बाबत कंपनीने कोणताही खुलासा केलेला नाही.

कंपनीने आतापर्यंत लाइफ ब्रांडचे तीन स्मार्टफोन लाइफ अर्थ १, वाटर १ और वाटर२ स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. पण त्यात विशेष म्हणजे लाइफ फ़्लेम १ रिलायंस रिटेलच्या लाइफ ब्रांड स्मार्टफोन सीरीजचा सर्वात स्वस्त फोन आहे. हा फोन तुम्हाला काळा, लाल आणि पांढऱ्या रंगाच्या वेरिएंटमध्ये मिळेल. लाइफ ब्रांडच्या अन्य स्मार्टफोन सारखेच फ़्लेम १ भारतात वापर केल्या जाणाऱ्या ४जी एलटीई ही सुविधा यात उपलब्ध आहे.

या स्मार्टफोनमध्ये ४.५ इंचाचा एफ़डब्ल्यूवीजीए (४८०x८५४ पिक्सल) डिस्प्ले आहे. याचे ऑपरेटिंग सिस्टम अँड्रॉईड ५.१ लॉलीपॉप बेस असून हा डुयल-सिम फोन आहे. यात १.१ गीगाहर्ट्ज़ क्वाड-कोर क्वालकॉम स्नैपड्रैगन २१० (एमएसएम८९०९) प्रोसेसर देण्यात आला आहे तर १ जीबी का रॅम देण्यात आले आहेत. यात ८ जीबीची इनबिल्ट स्टोरेज क्षमता असून ती ३२ जीबीपर्यंत वाढवता येऊ शकते. यात ५ मेगापिक्सलचा रिअर कॅमरा आणि ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमरा देण्यात आला आहे. त्याचबरोबर कनेक्टिविटी फ़ीचरमध्ये जीपीआरएस/एज, ३जी, जीपीएस, ब्लूटूथ, वाय-फाय और मायक्रो-यूएसबी सुविधा देण्यात आल्या आहेत.

Leave a Comment