युरेकॉमचा ६४ जीबी रॅमचा लॅपटॉप सादर

urecom
कॅनडातील युरेकॉम या संगणक उत्पादक कंपनीने ६४ जीबी रॅमचा स्काय एक्स नाईन डब्ल्यू हा लॅपटॉप सादर केला आहे. कंपनीच्या एक्स नाईन लॅपटॉपचे हे अपग्रेडेट व्हर्जन असून त्याची किंमत २९३० डॉलर्स म्हणजे १ लाख ९८ हजार रूपये आहे. ही किंमत बेसिक मॉडेलची आहे व हायएंड मॉडेल ११४७३ डॉलर्स म्हणजे सुमारे ८ लाख रूपयांना मिळणार आहे.

हा लॅपटॉप म्हणजे मोबाईल वर्कस्टेशन असल्याचा कंपनीचा दावा आहे. त्याला १६ जीबी रॅम असून ती ६४ जीबी पर्यंत वाढविता येते. लॅपटॉपची स्टोरेज स्पेस ५ टीबी आहे. लॅपटॉपचा स्पीड प्रचंड असल्याने तो थंड राहावा म्हणून त्यात अनेक फॅन्स बसविले गेले आहेत. १७.३ इंचाचा फोर के डिस्प्ले दिला गेला आहे मात्र फुल एचडी डिस्प्लेचे ऑप्शनही आहे. ६ यूएसबी पोर्ट, शिवाय मिनी डिस्प्ले पोर्ट ही दिले गेले असुन त्यावर चार मॉनिटर जोडता येतात. हेडफोन, माईक या सुविधांबरोबर कंपनीने लॅपटॉपसाठी तीन वर्षांची वॉरंटी दिली आहे.

Leave a Comment