मुंबई विद्यापीठात सुरु होणार एव्हिएशन कोर्स!

aviation
मुंबई : बीएसस्सी इन एव्हिएशन हा कोर्स मुंबई विद्यापीठ सुरु करणार असून ज्यासाठी विद्यापीठ स्वत:चे विमान घेण्याच्या विचारात आहे. आज विद्यापीठात मॅनेजमेंट काउंसीलच्या बैठकीत तसा प्रस्ताव मांडण्यात येणार असून त्यावर चर्चा होणार आहे. तसेच बॉम्बे फ्लाईंग क्लबसोबत यासाठी करार केला जाण्याचीही शक्यता आहे.

कोणतीही अडचण एव्हिएशन शिकणा-या विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक शिकण्यासाठी येवू नये यासाठी कलिना कॅम्पसमध्येच सर्व सोयी सुविधा पुरवण्याच्या तयारीत विद्यापीठ असून यासाठीच मुंबई विद्यापीठ स्वत:चे विमान घेत असल्याची चर्चा सुरू आहे.

Leave a Comment