रोड रोमिओला हा अवलिया देणार २२० व्होल्टचा शॉक

glove
जयपूर – मुलींचे रस्त्यावरच्या रोड रोमिओंपासून संरक्षण करण्यासाठी राजस्थानमधील एका युवकाने ‘शॉकिंग ग्लोव्ह’ नावाचे एक उपकरण तयार केले असून हे उपकरण फक्त १५० ग्रॅम वजनाचे आहे आणि ते हाताच्या मनगटावर बांधता येते. या उपकरणाला छेड काढणा-या रोमिओचा स्पर्श झाला तर त्याला २२० व्होल्टचा शॉक बसतो.

या उपकरणामुळे मुलगी कुठे फसली आहे त्याची माहिती देखील मिळते. त्याशिवाय या उपकरणाव्दारे संदेश पाठवता येतो आणि घटनेचे चित्रीकरणही करता येते. या उपकरणाला यावर्षी जानेवारी महिन्यात राज्यस्तरीय विज्ञान परिषदेत पहिल्या क्रमाकांचे पारितोषिक मिळाल्यानंतर या उपकरणाकडे सरकारचे लक्ष गेले.

मार्च महिन्यात दिल्लीमध्ये होणा-या राष्ट्रीय विज्ञान परिषदेत हे उपकरण मांडण्यात येणार असून हे उपकरण १७ वर्षाच्या निरंजन सुथार या युवकाने बनवले आहे. राजस्थानच्या जालोर जिल्ह्यातील अहोर सरकारी शाळेत तो १२ वी च्या वर्षाला आहे. विशेष म्हणजे तो कला शाखेचा विद्यार्थी आहे. संपूर्ण देशभरात गाजलेल्या दिल्ली सामूहिक बलात्कार प्रकरणाच्या घटनेनंतर त्याने मुलींच्या सुरक्षिततेसाठी उपकरण बनवण्याचा ध्यास घेतला. त्यानंतर दोन वर्षांच्या अथक मेहनतीनंतर त्याने हे उपकरण बनवले. या उपकरणाला त्याने ‘शॉकिंग ग्लोव्ह’ असे नाव दिले आहे. या ग्लोव्हमध्ये सीम कार्ड, जीपीएस चीप, व्हिडीओ कॅमेरा आणि ३.४ व्हॉल्टची बॅटरी आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *