भारताची बासमती टॅग स्पर्धेत पाकिस्तानवर सरशी

basmti
चेन्नई – बासमती तांदळाला जागतिक पेटंट मिळविण्याच्या प्रयत्नात असणा-या पाकिस्तानला मोठा झटका बसला असून पाकिस्तानच्या बासमती तांदळाचा जीआर (जीऑग्राफिकल इंडिकेशन) टॅग देण्याचा अर्ज इंटलेक्चुअल प्रॉपर्टी अपीलेट बोर्डाने (आयपीएबी) फेटाळला आहे. भारताला आता हा टॅग मिळण्याच्या शक्यतेमध्ये वाढ झाली आहे.

भारतीय संस्था एपीडाच्या (कृषी आणि खाद्य उत्पादन निर्यात विकास प्राधिकरण) अर्जाला विरोध करत पाकिस्तानच्या लाहोर येथील बासमती उत्पादक संघटनेने (बीजीए) आयपीएबीकडे अर्ज दाखल केला होता. एपीडाने भारतातील सात राज्यांमध्ये उत्पादन करण्यात येणा-या बासमती तांदळाचा टॅग मागितला होता. यामध्ये पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर आणि उत्तराखंड या राज्यांचा समावेश होता.

भारताच्या बासमतीला समान जीआय टॅग देण्यासाठी बीजीएने विरोध केला होता. चेन्नई येथील जीआरच्या सहाय्यक रजिस्टारने मध्य प्रदेशच्या भागामध्ये उत्पादन करण्यात येणा-या तांदळाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला होता, असा आरोप पाकिस्तानने केला होता. मात्र आयपीएबीने पाकिस्तानचा दावा फेटाळला आहे. बीजीए नियमांचे पालन करण्यात अपयशी ठरल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Leave a Comment