वैष्णोदेवीला यंदा विक्रमी संख्येने भाविक

vaishno
माता वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी यंदा जानेवारीत सुमारे साडेचार लाख भाविकांनी हजेरी लावली असून यंदाचा यात्रा सीझन भाविकांच्या तुडुंब गर्दीचा राहील अशी आशा श्राईन बोर्डाने व्यक्त केली आहे. २०१५ जानेवारीत आलेल्या भाविकांच्या संख्येपेक्षा यंदाची संख्या ७२ हजारांनी अधिक असल्याचे समजते.

गेल्या वर्षात खराब हवामानामुळे एकंदर यात्राकाळात कमी संख्येने भाविक आले होते. मात्र यंदा हवामान स्वच्छ असल्याने हेलिकॉप्टर, बॅटरी कार व अन्य सुविधांचा फायदा तीर्थयात्रेकरूना मिळतो आहे. सध्या दररोज ८ ते १० हजार भाविक मॉ वैष्णोदेवीच्या दरबारात हजेरी लावत आहेत. पहिल्या महिन्यापासूनच गर्दी होऊ लागल्याने श्राईन बोर्डचे अधिकारी खूष आहेत तसेच स्थानिकही उत्साहात आहेत. हवामानाची साथ अशीच राहीली तर यंदा विक्रमी संख्येने भाविक येथे येतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Leave a Comment