बुधवारी सराफा व्यापा-यांचा देशव्यापी संप

jwellers
नवी दिल्ली : देशभरातील ज्वेलर्स येत्या १० फेब्रुवारीला दोन लाखांपेक्षा अधिक किंमतीचे सोने खरेदी केल्यास पॅन कार्ड अनिवार्य करण्याच्या सरकारच्या निर्णयाविरोधात देशव्यापी संप करणार आहेत. सोन्याच्या व्यवसायात २५ ते ३० टक्के घसरण सरकारच्या या निर्णयामुळे झाली असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. पॅन कार्ड अनिवार्य करण्यासाठी सोनेखरेदीची मर्यादा दोन लाखांवरून पाच लाख करावी, अशी मागणी ज्वेलर्सच्या संघटनांनी केली आहे.

सरकारच्या या निर्णयाविरोधात देशभरातील ज्वेलर्स संप करणार आहेत. दिल्ली ज्वेलर्स असोसिएशनचे अध्यक्ष योगेश सिंघल यांनी सरकारच्या या निर्णयास आम्ही विरोध करणार अहोत, असे सांगितले. सरकारच्या या निर्णयाविरोधात देशभरातील सोन्याचे व्यापारी आपापली दुकाने बंद ठेवतील, असे ते म्हणाले.

सोन्याच्या व्यापा-यांच्या अनुसार, सरकारच्या या मनमानीमुळे ज्वेलर्सचे कोटवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. सोन्याच्या व्यापारावर याचा अत्यंत विपरित परिणाम झाला आहे. व्यापारात २५ ते ३० टक्के घसरण झाली आहे. सरकारने एक तर ही मर्यादा पाच लाख करावी अन्यथा कराचा स्लॅब कमी करावा ज्यामुळे जास्तीत जास्त लोक पॅन कार्डच्या कक्षेत येतील, असे सिंघल यांनी म्हटले आहे.

Leave a Comment