टायटनचे स्मार्टवॉच बाजारात दाखल

titan
बाजारात टायटन जक्स्ट हे अॅनालॉग ओएलइडी डिस्प्ले असलेले स्मार्टवॉच दाखल झाले असून हे घडयाळ टायटनने जागतिक पातळीवर म्हणजेच ग्लोबल पातळीवर लाँच करण्याचा निर्णय घेतला आहे. एचपी बरोबर मिळून टायटनने लाँच केलेले पहिले घडयाळ आहे. जक्स्ट हे अन्य कोणत्याही अॅनालॉग घडयाळाप्रमाणेच दिसणारे घडयाळ आहे परंतू त्यावर असलेल्या ओएलइडी डिस्प्लेवर सुचना दिसतात. जक्स्ट हे अॅर्न्ड्राइड आणि आयओएस उपकरणांशी सहज जोडता येते. रोझ गोल्ड, स्टेनेलेस स्टील आणि टायनोनियम या तीन प्रकारात हे घडयाळ सध्या उपलब्ध असून पुर्वनोंदणी करुन तुम्ही ते १५ हजार ९९५ रुपयात घेऊ शकता.

Leave a Comment