अमेझॉनच्या अॅपवरुन खरेदी केलेल्या मोबाईलचे परत मिळणार नाहीत पैसे

amazon
मुंबई : ई-कॉमर्स वेबसाईट अमेझॉन इंडियाच्या अॅपवरुन स्मार्टफोन खरेदी करणाऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची माहिती समोर आली असून ७ फेब्रुवारीपासून अमेझॉनने आपल्या मोबाईल अॅपवरुन खरेदी केलेल्या स्मार्टफोनवर ‘Fullfilled by Amazon’ असा टॅग दिला आहे, जर आपण खरेदी केलेला स्मार्टफोन काही कारणास्तव परत केल्यास, त्यावर रिफंड मिळणार नसल्याचा नियम लागू केला आहे.

७ फेब्रुवारीला आपल्या रिटर्न पॉलिसीमध्ये अमेझॉन इंडियाने बदल केला असून अमेझॉनच्या नव्या रिटर्न पॉलिसीनुसार अॅपवरुन खरेदी केलेला स्मार्टफोन परत करता येणार नाही. पण वेबसाईटवरुन स्मार्टफोन खरेदी केल्यास, त्यात काही बिघाड असल्यास परत करण्याची सुविधा मिळेल.

अमेझॉन इंडियाच्या नव्या रिटर्न पॉलिसीनुसार, अमेझॉनद्वारे ज्या मोबाईलला सर्टिफाय केले असेल, तेच मोबाईल बदलले जाऊ शकतात. पण fulfilled by Amazon टॅग असणारे मोबाईल परत घेतले जाणार नाहीत किंवा रिफंडही मिळणार नाही. शिवाय ज्यांनी वेबसाईटरुन मोबाईल खरेदी केला आहे आणि त्यात बिघाड असल्याचे लक्षात आल्यास केवळ १० दिवसांच्या आत मोबाईल परत करावा लागणार आहे.

दुसरीकडे स्नॅपडीलवरुन कोणतीही वस्तू खरेदी केल्यानंतर पसंत आली नाही, तर परत करण्याची सुविधा आहे. पण बिघाड असलेला मोबाईल ७ दिवसांच्या आत परत करण्याची अटही स्नॅपडीलने ठेवली आहे.

Leave a Comment