‘ट्राय’ची नेट न्यट्रॅलिटीला मंजुरी विजय

net-nutrility
नवी दिल्ली : फेसबुकच्या ‘फ्री बेसिक्स’ मोहिमेला टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथोरिटी ऑफ इंडियाने (ट्राय) जोरदार दणका दिला असून फेसबुकची ‘फ्री बेसिक्स’ मोहीम रद्द करत ट्राय नेट न्युट्रॅलिटीच्या बाजूने उभी राहिली आहे. त्याचबरोबर ट्रायने मनमानी पद्धतीने इंटरनेटसाठी दर आकारता येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

टेलिकॉम कंपन्यांनी जर इंटरनेट डेटासाठी वेगवेगळे दर आकारल्यास त्यांना ५० हजारांचा दंड ठोठावला जाणार आहे. काही टेलिकॉम कंपन्या ग्राहकांना इंटरनेटच्या खास ऑफर देतात. मात्र, ट्रायने यावरही बंदी आणली आहे.

फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांना ट्रायच्या निर्णयामुळे मोठा धक्का मानला जातो आहे. ग्रामीण भागातील लोकांना इंटरनेटशी जोडण्यासाठी फेसबुकने ‘फ्री बेसिक्स’ची मोहीम सुरु केली होती. मात्र, मार्क झुकरबर्ग यांच्या महत्त्वाकांक्षी ‘फ्री बेसिक्स’ मोहिमेवर ट्रायने पाणी फेरले आहे.

Leave a Comment