चंद्रावर चालल्याचा आनंद देतील हे बूट

shoes
अंतराळात चालण्याचा आनंद घ्यायचा असेल तर आता प्रत्यक्ष अंतराळात जाण्याची गरज भासणार नाही. संशोधकांनी अंतराळवीरांना अंतराळात चालताना किंवा चंद्रावर चालताना जो अनुभव येतो तो सर्वसामान्य माणसांनाही मिळावा यासाठी खास बूट तयार केले आहेत. हे बूट घातले की अंतराळवीरांसारखा पोशाख न करता आणि लक्षावधी मैलांचा अंतराळप्रवास न करताही अंतराळात चालल्याचा अनुभव घेता येणार आहे.

मूनशाईन कंपनीने तयार केलेले हे बूट २०ः११ मूनवॉकर नावाने विक्रीसाठी आणले जात आहेत. यात शक्तीशाली चुंबकाचा व चुंबकीय नियमांचा वापर केला गेला आहे. चुंबकाचे दोन समांन ध्रुव एकमेकांपासून दूर जातात हे तत्त्व वापरून या बूटांचे सोल बनविले गेले आहेत. त्यामुळे चुंबकीय प्रभाव क्षेत्र तयार होते. त्यासाठी सर्वात शक्तीशाली अशा ४५ नियोडाइमियम या धातूपासून बनविलेल्या चुंबकांचा वापर केला गेला आहे. हा धातू स्वतःचे चुंबकीय क्षेत्र तयार करतो. बूटाच्या सोलमध्ये दोन्ही बाजूंना १२-१३ चुंबक बसविले गेले आहेत व त्यामुळे प्रतिकर्षण बळ तयार होते. बूटांच्या दोन थरात ६ सेंमी अंतर असल्याने हे सोल गादीसारखे काम करतात. व चालण्याचे संतुलन राखले जाते.

या बूटांचे डिझाईन इंजिनिअर पॅट्रीक जरेजिरी यांनी तयार केले असून यात संपूर्ण पाऊल मॅग्नेटिक शक्तीने कव्हर केले जाते. बूटाचा आतला भाग पॉलिथिनचा असून बाहेरचा भाग सिंथेटिक फायबरचा आहे. नासा त्यांच्या अंतराळवीरांसाठी हीच सामग्री वापरून बूट तयार करते. हे बूट सप्टेंबरमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होऊ शकणार आहेत.