कॅन्सर, एड्‌सवरील औषधे महागणार

medicine
नवी दिल्ली – सरकारने कर्करोग आणि एचआयव्ही/एड्‌सवरील औषधांसह एकूण ७४ औषधांच्या आयातीवरील अबकारी सवलत काढून टाकली असल्याने या औषधांच्या किमतीत मोठी वाढ होणार असून, विशेषत: कर्करोग आणि एड्‌सवरील उपचारही महागणार आहेत.

गेल्या आठवड्यात या सर्व ७४ औषधांच्या आयातीवरील अबकारी सवलत काढून टाकण्यात येत असल्याची अधिसूचना केंद्रीय अबकारी आणि जकात मंडळाने जारी केली. ज्या औषधांवर आता अबकारी शुल्क आकारण्यात येणार आहे, त्यात किडनी स्टोनवरील उपचार, कॅन्सर केमोथेरेपी ऍण्ड रेडिओथेरेपी, हृदयातील ठोके सुरळीत करणारे औषध, मधुमेह, पार्किनसनचे आजार, हाडांचे आजार आणि साथीच्या रोगांवर उपचार करणारे ऍन्टिबायोटिक्स यासारख्या औषधांचा समावेश असून, त्यांच्या किमतीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.

याशिवाय, बॅक्टेरिअल इन्फेक्शन, लुकेमिया, ऍनेस्थेटिक मेडिकेशन, एचआयव्ही, हेपॅटायटिस बी व्हायरस पेशी, ऑर्थ्रायटिस यासारख्या आजारांवर उपचार करणारी औषधेही आता महाग होणार आहेत.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment