कॅडबरी-पार्लेवर पतंजलीची सरशी

patanjali
नवी दिल्ली: प्रसिद्ध कॅडबरी आणि पार्ले या ब्रांडला योगगुरु बाबा रामदेव यांच्या पतंजली आयुर्वेद लिमिटेडने मागे टाकले आहे. पतंजली आयुर्वेद लिमिटेड सगळ्यात मोठी एफएमसीजी ऍडव्हर्टायजिंग कंपनी बनली आहे. पतंजली ब्रँड्सच्या अंतर्गत दाखवण्यात येणाऱ्या जाहिरातींची संख्या कॅडबरी, पार्ले आणि पॉन्ड्स यांच्या जाहिरातींपेक्षा जास्त आहेत.

ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काऊंन्सिलने याबाबतची आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. बीएआरसी जवळपास ४५० चॅनल्सवर लक्ष ठेवते. त्यांच्या या आकडेवारीनुसार २३ जानेवारी ते २९ जानेवारी या काळामध्ये पतंजली प्रॉडक्ट्सच्या जाहिराती १७ हजारपेक्षा जास्त वेळा प्रसारित करण्यात आल्या. तर कॅडबरीची संख्या १६ हजार एवढी होती.

बाबा रामदेव यांच्या पतंजलीने जाहिरातींसाठी ३०० कोटी रुपयांचा खर्च केला असल्याचे बोलले जात आहे. पण पतंजलीने मात्र याचं खंडन केले आहे.

Leave a Comment