अॅपल घेणार फुटलेला आयफोन

iphone
आयफोनच्या चाहत्यांसाठी मोबाईल उत्पादक कंपनी अॅपलने खुशखबर दिली असून जे आयफोन युझर्स आपला आयफोन अपग्रेड करू इच्छित आहेत त्यांच्याकडून अॅपल पहिल्यांदाच तुटलेले-फुटलेले आयफोन घेणार आहे. आतापर्यंत कंपनी फक्त अशा आयफोनचा स्वीकार करत होती ज्याची स्क्रीन आणि बटण व्यवस्थित आहेत. कंपनीने ही नवी योजना फक्त आयफोन ५ आणि त्यानंतरच्या मॉडेलसाठी आहे. ज्यामुळे जास्तीतजास्त लोक आयफोन खरेदी करण्यासाठी उत्साहित होतील. कंपनीच्या या नव्या योजनेचा खुलासा टॅक ब्लॉक ९टू५मॅक या संकेतस्थळावर झाला आहे.

या बातमीला दुजोरा कंपनीचे प्रवक्ता निक लीही यांनी दिली आहे. अमेरिकेत कंपनी व्यवस्थीत स्क्रीन आणि व्यवस्थीत बटणसाठी ३५० अमेरिकी डॉलर म्हणजेच २३४०० रुपयांचे क्रेडिट देते आणि तुटलेल्या आयफोन ५साठी ५०डॉलर, आयफोन ६ साठी २०० डॉलर आणि आयफोन ६ प्लससाठी २५० डॉलरचे क्रेडिट देते.

Leave a Comment