विद्यार्थ्यांनी बनवली १ लिटर पेट्रोलमध्ये २०० किमी धावणारी सायकल

cycle
आग्रा : चक्क २०० किमी अंतर ताशी ३५ वेगाने आणि ते सुद्धा एक लिटर पेट्रोलमध्ये सायकल चालू शकते का? याचे उत्तर हो असेच आहे. पेट्रोलवर धावणारी सायकल आग्रा येथील पाच विद्यार्थ्यांनी तयार केली आहे. त्यासाठी शेतात औषध मारण्यासाठी लागणाऱ्या मशिनचा वापर केला आहे.

पेट्रोलची टाकी बसविण्यासाठी सायकलच्या पाईपचा वापर करण्यात आला आहे. टाकीची क्षमता १ लिटर असून मोटरसायकलच्या पेट्रोल टाकीप्रमाणे या सायकलची टाकी आहे. तर हॅंडलला एक्सीलेटरचे रुप देण्यात आले आहे.

ही सायकल ऑटो मोबाईल इंजिनिअरिंग करणाऱ्या पाच विद्यार्थ्यांनी बनविली आहे. मुकुल गौड, विक्रांत रावत, रंजूल मिश्रा, सुधांशु गोस्वामी आणि तुषार गोयल यांनी यासाठी मेहनत घेतली. त्यांनी यू-ट्यूबवर अमेरिकन पेट्रोल बाईक पाहिली आणि त्यांना ही कल्पना सुचली.

Leave a Comment